सावली तालुक्यातील मानकापूर येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जखमी.
एस.के.24 तास
सावली : मानकापूर येथील शेतकरी स्वतःचे गुरे घेऊन चराईसाठी रिंगदेव तलावात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला. आरडाओरड केली असता वाघ पळून गेला. सुदैवाने प्राण वाचले.वनविभागाला गावकऱ्यांनी माहीती दिली.जखमी व्यक्तीला घेऊन बिटाचे वनरक्षक दवाखान्यात भरती केले.ही घटना आज दुपारच्या वेळी 2:10 वा.च्या दरम्यान घडली.
जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रभाकर विस्तारी वेटे वय,52 वर्ष रा.मानकापूर आहे.
तालुक्यातील चारगाव बिटात रिंगदेव तलाव आहे.कक्ष क्र.३०२ येथील जंगलात प्रभाकर वेटे हे स्वतः चे बैल ढोर पाळीव जनावरे घेऊन गेले होते. बैल चराई करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. यात तो इसम गंभीर जखमी झालाआहे.मानेला मोठ्या जखमा असून छातीवर पंजाचे खुणा आहेत.
जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील उपचारकरीत सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे हलविण्यातआले. वनविभागाने जखमी व्यक्तीला१०हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत दिली. यावेळी परमेश्वर खेळकर सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्रअधिकारी,अनिल मेश्राम क्षेत्र सहाय्यक, विकास उईके वनरक्षक,आखाडे वनरक्षक आदीनी मदत केली.