डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स,ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दि,३०/०१/२५ डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स,ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अड्याळ (जाणी)या दत्तक गावी 'युथ फॉर माय भारत' या संकल्पनेवर आधारीत "आरोग्यदायी, पर्यावरण आणि डिजिटल साक्षरतेकरीता युवाशक्ती" या विषयांना अनुसरुन सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने २८ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदा (ब्रह्मपुरी) चे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी यावेळी अड्याळ गावच्या संपूर्ण विकासासाठी तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन शिबिरार्थी स्वयंसेवकांना केले व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली.
शिबिराचे उद्घाटक मा.श्री. कैलास धोंडने, आर.एफ.ओ वडसा (देसाईगंज) यांनी गावातील सर्वांगीण प्रगतीसाठी स्वच्छ, आरोग्यदायक आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणे महत्वाचे आहे व त्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने आपले संपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबध्द राहावे आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या संस्थेच्या सदस्या मा.सौ. रीमा कांबळे यांनी गावातील लोकांना डिजीटल साक्षर करण्यासाठी शिबिरार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अड्याळ गावचे उपसरपंच व माजी उपसभापती, पं.स. ब्रह्मपुरी मा.श्री.नामदेव लांजेवार यांनी गावातील सामाजीक, आर्थिक,आरोग्य,शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाची परंपरा जतन करणे आवश्यक असून त्यासाठी महाविद्यालयाचे रा.से.यो. विभाग वेळोवेळी नवउपक्रम गावामध्ये राबवित असते.
व त्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच भक्कमपणे महाविद्यालयाच्या रासेयो विभागाला सहकार्य करील अशी ग्वाही दिली. या प्रसंगी मंचावर जि. प.उच्च.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. बळीरामजी लांजेवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.सौ.नगीना तुमसरे, ग्रामपंचायत सदस्य राजेशवरजी गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.श्री. विनोद वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश कोसे यांनी केले तर आभार रा.से.यो. शिबिरार्थी आदित्य बोरकर यांनी व्यक्त केले.या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, जि.प.उ..प्रा.शाळेचे सर्व शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.