बालसाहित्य बालमनाची मशागत करते. - डॉ.धनराज खानोरकर ★ वाचन संकल्प महाराष्ट्र अभियान.

बालसाहित्य बालमनाची मशागत करते. - डॉ.धनराज खानोरकर 


★ वाचन संकल्प महाराष्ट्र अभियान.


एस.के.24 तास


ब्रम्हपूरी - ०७/०१/२४ " आजच्या मोबाईलच्या जमान्यात बालकं पुस्तकांपासून लांब आहेत.लिहणे,वाचणे ते विसरु नयेत याकरीता त्यांना विपुल बालभारती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.



" इवली इवली वेली बाई,इवले इवले पान गं/दिसते किती छान गडे,दिसते किती छान गं ! // " अशी सहजसुलभ गाणी त्यांच्या ओठी असावी,म्हणजे त्यांच्या मनाची मशागत होईल" असे काव्यमय विधान कवी डॉ.धनराज खानोरकरांनी केले.ते कहाली येथील जि.प.शाळेत 'वाचन संकल्प महाराष्ट्र ' अभियानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

     

विचारपीठावर कवी अमरदीप लोखंडे, मुख्याध्यापक भीमराव पाटील ,स.शिक्षक राजेंद्र दोनाडे,समता वाचनालयाचे सचिव संघरक्षक डांगे,यशवंत पाटील,वावरे सर, अजय डांगे उपस्थित होते.कवी अमर लोखंडेनी, तुम्ही रोज खऱ्याच्या पाच खांडी खाण्यापेक्षा प्रत्येक विषयाचे पांच शब्द पाठांतर करा, आपोआपच लिखाणाची आणि वाचनाची आवड निर्माण होऊन सुंदर हस्ताक्षर जन्माला घालू शकता. 


व्यसनापासून दूर व पुस्तकांच्या सहवासात राहण्याचा सल्ला दिला. आणि शाळेला बुटी मारणाऱ्या पोरांवर एक स्वरचित- शाळेच्या वेळेवर.फिरते हा घरोघर.... हे गीत सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.


कार्यक्रमाचे संचालन व आभार संघरक्षक डांगें यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.कहाली व समता वाचनालयाचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !