नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व्याहाड (बुज) येथे ; माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करून एक भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
सावली : नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व्याहाड (बुज) च्या भव्य प्रांगणावर माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळून दहावीचे शिक्षण घेऊन 15 वर्षे पूर्ण झाले या अनुषंगाने स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करून एक भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सन 2008- 09 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असणारे माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.लेझीम आणि ढोल ताशा च्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे आगमन करून अतिशय थाटामाटात प्रमुख पाहुण्यांचे शब्द सुमनाने व स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना माजी विद्यार्थ्याकडून शाल पुष्पगुच्छ तथा उच्च दर्जाची भारतीय संविधानाचे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच उपस्थित आजी माजी विद्यार्थ्यांना,शिक्षक,शिक्षक वृंद कर्मचारी यांना संविधानाचे पुस्तक वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या शाळेच्या स्थापनेपासून इतका भव्य दिव्य कार्यक्रम शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडून आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एस.डी.भगत सर होते. प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त मुख्याध्यापक वी. डी. जिरकुंटवार सर व एम. डी. पठाण सर,कर्मवीर छात्रालय व्याहाड (बुज) चे अधिक्षक तु.बा.कुनघाडकर सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख एस.एन.गव्हारे सर व सर्व प्राध्यापक वृंद
माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षिका वृंद आणि पूर्व माध्यमिक चे विभाग प्रमुख एस.पी.मेश्राम सर व सर्व शिक्षक-शिक्षिका वृंद. तसेच शाळेचे जेष्ठ लिपिक एस.डी.फुलझेले सर, सामाजिक कार्यकर्ता दीपक गद्देवार,होमनाथ मेश्राम, डॉ. वैभव कुनघाडकर,आदी मान्यवर आणि आजी-माजी विध्यार्थी कुटुंबासहित उपस्थित होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन भगत सर व कुनघाडकर सर यांचे लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बी. बुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग १० वी ची विद्यार्थिनी श्रुती रोहणकर, प्रस्थावना इंजि. ऐश्वर्य मेश्राम तर आभार प्रदर्शन सुधीर इंदोरकर यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाला वाटर कुलर सप्रेम भेट. : -
स्नेह मिलन समारोहात 15 वर्षानंतर प्रफुल कोलते, विश्रांती वाढई, नेत्रा लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या त्यामध्ये आपापल्या वेगवेगळ्या शैलीतून हास्याची व विनोदाची फुले बहरली. तर नवभारत विद्यालय व्याहाड (बुज) येथील जुन्या आठवणी जाग्या झाल्याने उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा क्षण आनंदाचा आणि भावनिकतेचा होऊन गेला होता.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण व्हावा यासाठी प्रमोद वाकडे,शीतल ढोलने सहारे, राकेश मेश्राम, विजय भांडेकर, राकेश गुरुनुले, रूपेश कावळे , ब्रह्मदेव नैताम,सुबोध गेडाम व सर्व माजी विद्यार्थ्यांचे महत्वाचे योगदान आहे.
ज्या शाळेत आम्ही शिकलो लहानाचे मोठे झालो त्या शाळेला आपल्याकडून काही देणं लागतं या युक्तीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना थंड पिण्याचे पाणी मिळण्याकरिता माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला 400 विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध होईल असे वॉटर कुलर सप्रेम भेट करण्यात आले.स्नेह मिलन सोहळा पार पडला...