चंद्रपूर येथून अमृतसर येथील पोलीस चौकीवर " हँडग्रेनेड " फेकणाऱ्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने केले अटक.

चंद्रपूर येथून अमृतसर येथील पोलीस चौकीवर " हँडग्रेनेड " फेकणाऱ्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने केले अटक.


एस.के.24 तास


चंद्रपूर : अमृतसर येथील पोलीस चौकीवर " हँडग्रेनेड " फेकणाऱ्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने चंद्रपूर येथून अटक केली. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. 


जसप्रीत सिंग वय,20 वर्ष असे या खलिस्तानवाद्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.

जसप्रीत सिंगने २०२३ मध्ये अमृतसर येथील पोलीस चौकीवर हल्ला केला होता. अमली पदार्थांच्या व्यवसायातही तो सक्रिय होता. पोलीस चौकीवरील हल्ल्यानंतर तो पसार झाला. तेव्हापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. 

सहा दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जसप्रीत सिंग चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे आला होता. येथील लॉयड मेटल कंपनी परिसरात तो अन्य ओळखीच्या व्यक्तींसोबत राहात होता. येथूनच गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने त्याला अटक केली.

जिल्ह्यात सिमेंट, पोलाद, पेपर मिल, आयुध निर्माण कारखाना तसेच वीज केंद्र व इतरही मोठे उद्योग आहेत. या उद्योगात परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने येत आहेत. या कामगारांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या कामगारांचा देखील मोठ्या संख्येने समावेश आहे.अशा स्वरूपाचे गुन्हेगारी कामगार येथे येत असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगरी वाढल्याचा आरोप होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !