काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंती निमित्याने अभिवादन.
सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली : १९ व्या शतकातील आद्य क्रांतिकारक समाजसेविका सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका होत्या, त्यांनी देशातील स्त्रीवादी चळवळ आणि स्त्री शिक्षणाचे नेतृत्व केले. सामाजिक सुधारणेसाठी पती क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अर्थातच फुले दांपत्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि बालविवाह, स्त्री शिक्षण आणि जातिभेद यांसारख्या विविध कारणांच्या जागृतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ३ जानेवारी हा दिवस भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो.त्यांनी भारतीय समाजातील स्त्रिया आणि शोषित वर्गाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.आज काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अभिवादन करतेसमयी काँग्रेस शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, युवा अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,शेतकरी राईसमील सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार,नगरसेवक प्रफुल वाळके,सचिन संगीडवार, रोशन बोरकर,पंकज सुरमवार,कमलेश गेडाम,परेश तावाडे ,आशिष खोब्रागडे, कुणाल मालवनकर आदी उपस्थित होते.