नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे. - डाँ.डी.एच.गहाणे प्राचार्य ने.हि. महाविद्यालय,ब्रम्हपुरी
अमरदिप लोखंडे - सहसंपादक एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : भारतीय लोकशाही ही सशक्त आहे. त्या लोकशाहीतील नागरिक हा मतदार आहे. मतदारांनी जात, धर्म व वंश या कोणत्याही प्रभावाखाली न येता तसेच कोणतेही प्रलोभन न स्विकारता आपल्या निर्वाचन क्षेत्रात मतदाना निर्भयपणे हक्क बजावून लोकशाहीला मजबूत करावे. भारतीय लोकशाही ही पारदर्शक आहे. देशाच्या प्रगतीकरिता उत्तम प्रतिनिधीची निवड करुन निर्भयपणे मतदान करावे.असे डाँ डी एच गहाणे यानी रासेयो स्वयंसेवकांना शपथ देवून मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन व सूत्रसंचाल डाँ प्रकाश वट्टी यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित डाँ.आर के डांगे,डाँ डी एल खानोरकर,विद्यार्थी प्रतिनिधी पंकज भोयर, रासेयो प्रतिनिधी अनिकेत शेंडे, समिक्षा पंडीत, सुषमा ढुसे, मानस गेडाम, लोमेश आबोणे, नयन मेश्राम, सुनिल राऊत, गणेश धनजुले,सौरभ तलमले, अजय आठोळे, कार्तिक गुरनुले, स्वप्निल खेळकर व ओम नैताम इत्यादी स्वयंसेवक उपस्थित होते.