तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आर्वी तर्फे तालुकास्तरीय आढावा सभा संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आर्वी तर्फे पंचायत समिती आर्वी येथील सभागृहात तालुकास्तरीय आरोग्य विषयक आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पराडकर सर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विखे मॅडम, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रेवतकर सर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.बेले सर
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.पाटील सर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्मा सर यांनी आरोग्य विषयक असलेल्या सर्व इंडिगेटर चा संपूर्ण आढावा घेण्यात आला, व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.या महिन्यात आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या सक्रिय क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेबाबतचे संपूर्ण आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या, त्यावेळी तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,आढावा सभेचे सूत्रसंचालन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक चव्हाण यांनी केले.