डिग्री पेक्षा अनुभव मोठे. - श्री.अशोकजी भैया ★ वाचन संकल्प महाराष्ट्राचा, कृतिशील महाराष्ट्र शासणाचा उपक्रमाचे उद्घाटक म्हणून केलेले प्रतिपादन.

डिग्री पेक्षा अनुभव मोठे. - श्री.अशोकजी भैया  


वाचन संकल्प महाराष्ट्राचा, कृतिशील महाराष्ट्र शासणाचा उपक्रमाचे उद्घाटक म्हणून केलेले प्रतिपादन. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : अलिकडे वाचन संस्कृती लोप पावत आहे. अगोदर एखाद्या चहाच्या टप्परीवर वाचकांचा घोळका दिसायचा चहा टप्परीवर पाच ते सहा दैनिक वर्तमान पत्रे असायचे पण आता वाचकांची स़ंख्या मंदावली असल्याने चहाच्या टप-या सुध्दा ओस पडल्या दिसतात. आज आम्ही विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात म्हणून चोविस तास अभ्यास करण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध करुन दिले. जवळपास पंच्च्यात्तर हजार ग्रंथ, पाक्षिक,मासिक, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता विविध विषयाचे अद्यावत पुस्तके, भौतिक सुविधा  आहेत.


परंतु विद्यार्थी त्याचा फायदा घेत नाही. वाचनाने माणूस हा सुसंस्कृत होतो. योग्य व अयोग्य यात फरक समजते  आज जेवढे देशात  उद्योगपती आहेत. ते डिग्रीने नव्हे तर वाचनातून अनुभवाने  मोठे झाले, अनुभव हेच  गुरु आहे, म्हणून डाँ बाबासाहेब आंबेडकर  यांनी वाचाल तर वाचाल असे म्हटले आहे. वाचन हेच माणसाचे दिशा ठरवते. त्यामुळे एखाद्या डिग्री पेक्षा ज्ञान मोठे आहे.  


असे मौलिक विचार  आयोजित ग्रंथालय माहितीशास्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वान संकल्प महाराष्ट्राचा याकार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव  श्री अशोकजी भैया यांनी  प्रतिपादन केले. तसेच  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. डी. एच.गहाणे हे होते तर प्रमुख उपस्थिती डाँ शुभाष शेकोकर उपप्राचार्य, मेजर विनोद नरड, डाँ युवराज मेश्राम, डाँ रेखा मेश्राम व कु. सुषमा राऊत प्रभारी ग्रंथपाल ई. मान्य उपस्थित होते.


 याप्रसंगी प्राचार्य डी. एच. गहाणे यांनी वाचनाचे अनेक फायदे आहेत. आम्ही अहोरात्र अभ्यास करून ईथपर्यत मजल मारली ही खरी प्रेरणा डाँ बाबासाहेबाची आहे. अभ्यास हेच यशाचे सुत्र आहे. असे मौलिक विचार अध्यक्षीय मार्गदर्शनातून व्यक्त केले. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा डाँ युवराज मेश्राम अध्यक्ष, ग्रंथालय विभाग यांनी केले. तर सुत्रसंचालन डांँ प्रकाश वट्टी रासेयो कार्यक्रमाधिकारी  व आभार कु सुषमा राऊत यांनी मानले. 


कार्यक्रमाला महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक डॉ.टी.के गेडाम,डॉ.आर.के.डांगे,डॉ.असलम शेख,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.भास्कर लेनगुरे  तथा सर्व प्राध्यापक वृंद, उपस्थित होते. 


कार्यक्रम यशस्विकरिता डॉ.विवेक नागभिडकर,विनय भागडकर, निनावे,जयस्वाल,गोपाल करंबे,विपूल, जगदीश यांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !