आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव आविष्कार २०२४-२५ मध्ये ने.हि.महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१०/०१/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील आकांक्षा मेश्राम,निलेश मुखर्जी, चंद्रहास्य नंदनवार,सुमित म्हसाखेत्री,अमित ऊके या पांच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आविष्कार २०२४-२५ साठी निवड करण्यात आली.ही निवड गोंडवाना विद्यापीठात पार पडलेल्या संशोधन उत्सव आविष्कार २०२४-२५ यामध्ये करण्यात आली.
सदर निवडीबद्दल महाविद्यालयात नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, डॉ अतुल येरपुडे, डॉ धनराज खानोरकर,प्रा रुपेश वाकोडीकरांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.यशस्वीतेसाठी आविष्कार समितीचे डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ अरविंद मुंगोले,प्रा आकाश मेश्राम,प्रा अभय पवार,प्रा जयेश हजारे व अक्षय चहांदेंनी मोलाचे सहकार्य केले.