मुल जवळील रामपूर येथील जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून केले ठार.


मुल जवळील रामपूर येथील जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून केले ठार.


एस.के.24 तास


मुल जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना सोमवारी दुपारी घडली.त्याच्या मृतदेहाचे अवशेष बफर झोनच्या कक्ष क्रमांक ७५६ मधिल नियत क्षेत्र काटवन मध्ये मंगळवारी सकाळी सापडले. 


मृत गुराख्याचे नाव बंडू चिंधूजी कोल्हे वय,56 वर्ष असे आहे.गुराखी मुल जवळील रामपूर या गावातील रहिवासी होता. या घटनेने गावात खळबळ उडाली. मानव वन्यजीव संघर्षात आणखी एक गुराखी बळी पडल्याने जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नेहमी प्रमाणे बंडू कोल्हे हे रामपूर आणि मुल येथील जनावरे व शेळ्या घेऊन जंगलात चराईसाठी गेले होते. 


काही शेळ्या भटकल्याने ते शोधात होते. त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधून शेळ्या घरी आल्या का, याबाबत विचारपूस केली होती. रामपूर ते करून काटवन हा बफर झोनचा परिसर घनदाट जंगलाचा आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. संध्याकाळी गायी, म्हशी आणि शेळ्या न चुकता घरी परतल्या.बंडू कोल्हे परतले नाही.

पत्नीने गावात ही माहिती दिली. वनविभागाला सूचना देण्यात आली. मूल येथील बफर झोनचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी जंगलात शोधमोहीम राबवली. संध्याकाळपर्यंत थांगपत्ता लागला नाही. घनदाट जंगल आणि अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.

मंगळवारी सकाळी कक्ष क्रमांक ७५६ मध्ये मृतदेहाचे अवशेष सापडले. वाघाने ठार मारून बंडू यांचे शरीर फस्त केले होते. फक्त शरिराची हाडे तेवढी शिल्लक होती. घटनास्थळी त्यांची काठी आढळून आली.सापडलेली हाडे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. घटनास्थळी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारीवर्गांनी भेट देऊन पाहणी केली. मृतकाच्या कुंटुबीयांना वनविभागाच्या वतीने तात्काळ 20 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !