राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात पार पडले आंतरजातीय विवाह ; त्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यास अख्खे गाव सरसावले.
एस.के.24 तास
सावली : अंतरगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात पार पडले आंतरजातीय विवाह सोहळा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव यांच्या वतीने सोमेश्वर भक्तदास करकाळे व मेघा मधुकर मारभते, रा.अंतरगाव येथील नव वधू वर यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव यांचा वतीने 9 जानेवारी गुरुवार रोजी शुभविवाह लावून देण्यात आला.
समाजापुढे एक आदर्श ठेवीत लग्नातील आव्हाढव्य खर्चाला कात्री बसवीत दोन विभिन्न जातीतील जोडप्याने आंतरजातीय विवाह बंधनात बांधण्याची संमती दर्शविली यात दोन्ही कडील घरच्या मंडळींनी संमती देत विवाह पार पाडण्याचे ठरविले यात श्री गुरुदेव सेवा मंडळाने पुढाकार घेत या दोन्ही जोडप्यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजयांचा पुण्यतिथी महोत्सवात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साध्या व सोप्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला.
यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष शिशुपाल ठाकरे,नानाजी मुनघाटे, विठ्ठलराव ठाकूर, छायाताई चकबंडलवार, अशोक बारापात्रे, तुलशीदास ठाकरे, पंकज सातपुते, लीलाधर नागोसे, छगन उंदीरवाडे,बबनराव शेंडे,भक्तरास ठाकरे यमाजी सिडाम व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.