जन शिक्षण संस्थानचा द्वारा विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था,गोंदिया द्वारा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरुस्कृत जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
एस.के.24 तास
गडचिरोली : सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय शिवहरे यांनी केले यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत सावित्रीबाई फुले बाबत माहिती दिली.
मा.श्री. केशव आर.चव्हाण संचालक 'जन शिक्षण संस्थान, गडचिरोली'* यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणत बोलतांना पुढे म्हणाले सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवी होत्या. त्यांनी आपल्या पती जोतिराव फुले यांच्यासोबत स्त्रियांसाठी आणि शोषित वर्गासाठी शिक्षणाच्या दाराआड राहणाऱ्या समाजाचा प्रवाह बदलण्याचे काम केले.
सावित्रीबाई आणि जोतिराव यांनी पुण्यात १८४८ साली मुलींसाठी पहिले शाळा सुरू केली. त्यावेळी मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या समाजात शिक्षिका म्हणून काम करणे खूप कठीण होते. सावित्रीबाईंना अनेकदा लोकांचा विरोध सहन करावा लागला. लोक त्यांच्यावर दगड आणि चिखल फेकायचे. पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही. त्या रोज नवीन जोमाने शाळेत जात राहिल्या. स्त्री फक्त चूल आणि मुलं एवढंच त्यांचं विश्व अशी पूर्वी धारणा होती.
परंतु स्त्रियांसाठी सामाजिक सुधारणा करत सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणाचाच प्रसार केला नाही, तर बालविवाह, सती प्रथा, जातीय विषमता आणि विधवांच्या दुर्दशेविरोधात आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी विशेष आश्रयस्थाने तयार केली, जिथे विधवांना सन्मानाने जगता येईल. त्यांनी स्त्रियांना आपली ओळख आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी प्रेरित केले.इत्यादी बाबत उपस्तितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर,मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक, जन शिक्षण संस्थान,गडचिरोली कार्यक्रमाचे अध्यक्ष,जय शिवहरे, अभिजित कृष्णापुरकर, प्राची सातपुते,यश चव्हाण व प्रशिक्षनार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश चौधरी यांनी केले.
आज वडसा तालुक्यात चोप येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.चोप येतील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक तसेच महिला वर्ग उपस्थित.
चामोर्शी तालुक्यात सोनापूर ग्रामपंचायत येते सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली आणि कोरची येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित मा. रुकमोडे सर तसेच शाहरे मॅडम उपस्थित होते आणि सर्व मान्यवर आज जन शिक्षण संस्थान, गडचिरोली च्या माध्यमातून गडचिरोली,वडासा, चामोर्शी व कोरची येतील प्रशिक्षक श्रीमती शालू भंडारकार,पायल कोडापे, सुनीता मोहुर्ले,श्रीमती आशा गुरव, ममता सुखदेवे अन्य प्रशिक्षनार्थी उपस्थित होते.