विमलताई महिला महाविद्यालय सावली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी.
सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली : ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि स्त्रीमुक्तीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.३ जानेवारीला विमलताई महिला महाविद्यालय सावली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ३ जानेवारी हा दिवस भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्वाचा मानल्या जातो, त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवी होत्या.
त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्या सोबत स्त्रियांसाठी आणि शोषित वर्गासाठी शिक्षणाच्या दाराआड राहणाऱ्या समाजाचा प्रवाह बदलण्याचे काम केले. विमलताई महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. इम्रान पठाण सर यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन मुलींनी शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेतली पाहिजे असे आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंती निमित्त विमलताई महिला महाविद्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा एस.के.24 तास तालुका प्रतिनिधी रोशन बोरकर, पत्रकार आशिष दुधे, पत्रकार उमेश वाळके यशपाल गोंगले आणि महिला महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.