विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; विजापूर चकमकीत १२ नक्षलवादी ठार.
एस.के.24 तास
विजापूर : काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात आठ जवानांना वीरमरण आले होते. आता अवघ्या दहा दिवसांत सुरक्षा दलांनी या घटनेचा बदला घेतला आहे. गुरुवारी (ता. १६) ला सकाळपासून विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बातमी लिहेस्तोवर या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक दक्षिण विजापूरच्या जंगलात नक्षलविरोधी कारवाईवर गेले. या दरम्यान नक्सलवाद्यांशी त्यांचा सामना सुरु झाला. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू होता. नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात १२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत.डीआरजी विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोब्रा २०४, २०५, २०६, २०८, २१० आणि सीएआरआयपीयू २२९ बटालियनचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे.
पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत.डीआरजी विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोब्रा २०४, २०५, २०६, २०८, २१० आणि सीएआरआयपीयू २२९ बटालियनचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे. या सर्व बटालियनचे सैनिक नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया करत आहेत. रात्री उशिरापर्यंत विजापूरमधील मरुधबाका आणि पुजारी कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
नव्या वर्षात आतापर्यंत २६ नक्सालवाद्यांचा खात्मा : -
या वर्षी जानेवारी २०२५ मध्ये आतापर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. १२ जानेवारी रोजी, बिजापूर जिल्ह्यातील मद्दीद पोलिस स्टेशन परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच माओवादी ठार झाले. या वर्षी ६ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यातील कुत्रू भागात झालेल्या आयईडी स्फोटात ८ जवान आणि एक चालक शहीद झाले होते. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, राज्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी २१९ नक्षलवादी मारले होते.