मा.जिल्हाधिकारी सी.वामंथी वर्धा यांची आयुष्यमान आरोग्य मंदिर खरांगणा ( मो) येथे भेट.
एस.के.24 तास
वर्धा : मा.जिल्हाधिकारी सी.वामंथी यांची आज दिनांक १५जानेवारी २०२५ रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर खरांगणा (मोरांगणा)येथे भेट दिली व आरोग्य केंद्राची पहाणी केली ,तसेच राष्ट्रीय कार्यक्रमाविषयी इंडिकेटर ची तपासणी करण्यात आली.
भेटी दरम्यान विशेष प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मध्ये प्रसुतीचे प्रमाण वाढवावे व सर्व गरोदर माताच्या तपासण्या तसेच त्यांना चार भेटी होणे अपेक्षित आहे अशा सूचना देण्यात आल्या.
भेटीमध्ये आर्वी येथील मा.उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट,आर्वी येथील तहसीलदार मा.हरीश काळे मा.तालुका आरोग्य अधिकारी नीलेंद्रकुमार वर्मा व मा. वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता ढगे,मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रुती सहरे मॅडम आणि इतर कर्मचारी सर्व उपस्थित होते.