ग्रामपंचायत मालडोंगरी चे सचिव किशोर अलोने यांचा सपत्नीक सत्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०२/०१/२५ मालडोंगरी ग्रामपंचायत आणि ग्रामवासीय यांच्या वतीने सचिव किशोर अलोने यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला.सन२०१५ पासून मालडोंगरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून ०९ वर्ष उत्कृष्टपणे सेवा देणारे किशोर उर्फ बबलू अलोने यांचा भागवत सप्ताह गोपाल काल्याच्या समाप्तीचे औचित्य साधून
दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्राम वासियांच्या वतीने ग्रामपंचायत च्या सरपंचा मंजुषा ठाकरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन किशोर अलोने यांचा सपत्नीक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
याप्रसंगी ब्रह्मपुरी पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे, ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजुषा ठाकरे, विस्तार अधिकारी कुरसंगे, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत चे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी. आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळा व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी शिक्षक वृंद व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे यांनी ग्रामसेवक किशोर अलोने यांच्यावर स्तुती सुमने उधळत अत्यंत मोठा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.अनेक मान्यवरांनी किशोर अलोने आज पर्यंतच्या कार्यकाळात ग्रामसेवक म्हणून उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याचे सांगितले.