भालेश्वर येथे प्रबोधनकार डॉ.रामपाल महाराज धारकर सप्त खंजिरी वादक यांचे जाहीर कीर्तन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : मकर संक्रांतीचे औचित्य साधून शिवलिंग काली पुत्र नवनाथ मंदिर देवस्थान,भालेश्वर तालुका ब्रह्मपुरी च्या वतीने शिव यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचा व समाज प्रबोधनकार डॉ.रामपाल महाराज सप्त खंजिरी वादक तुरखेडा तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम वैनगंगा नदी किनारी दिनांक १४ जानेवारी २५ ला आयोजित करण्यात आलेला आहे.
या एक दिवशीय शिवयात्रा महोत्सव व महाप्रसाद कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमदार साकोली विधानसभा क्षेत्र,अध्यक्ष माननीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र,सत्कारमूर्ती माननीय खासदार डॉ.नामदेवरावजी किरसान गडचिरोली/ चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र,माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोळे खासदार भंडारा / गोंदिया लोकसभा क्षेत्र,
माननीय रामदासजी मसराम आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र आणि माननीय डॉ. सतीशभाऊ वार्जूरकर समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र, माननीय धनराज जी मुंगले संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग,माननीय यशवंत दिघोरे उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, ब्रह्मपुरी, माननीय प्रमोदजी चिमूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तरी शिव यात्रेला व सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य डॉ. रामपाल महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांनी व कीर्तन प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहून समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन वैनगंगा किनारी स्थित शिवलिंग काली पुत्र नवनाथ मंदिर देवस्थान भालेश्वर आयोजक समितीने केले आहे.