मातोश्री सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विकास विद्यालय अ-हेर नवरगाव येथे वाचन संकल्प महाराष्ट्र कार्यक्रम संपन्न. ★ खेड्यातील शिक्षक शहरातील शिक्षकासारखेच गुणवत्तापूर्ण व पदवीधारक असतात. - मुख्याध्यापक मंगल धोटे

मातोश्री सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विकास विद्यालय अ-हेर नवरगाव येथे वाचन संकल्प महाराष्ट्र कार्यक्रम संपन्न.


खेड्यातील शिक्षक शहरातील शिक्षकासारखेच गुणवत्तापूर्ण व पदवीधारक असतात. - मुख्याध्यापक मंगल धोटे


अमरदीप लोखंडे - सहसंपादक

 

ब्रम्हपूरी : दिनांक,०९/०१/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार मातोश्री सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने विकास विद्यालय, अ-हेरनवरगांव येथे वाचन संकल्प महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ग्रंथालय प्रदर्शनी भरविण्यात आली.या ग्रंथालय प्रदर्शनीचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगल धोटे यांनी वाचनालयाचे सचिव श्री किरण मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक अमरदीप लोखंडे व विद्यालयातील शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.



प्रमुख वक्त म्हणून मार्गदर्शन करताना अमरदीप लोखंडे म्हणाले की, वाचन करतांना लिहून घेणे म्हणजे वाचन केलेले आपल्या लक्षात राहते लिहिण्याची सवय पडून अक्षर वळणदार व सुंदर निघतात. शिक्षण घेत असताना नुसते पास होण्याला अर्थ नसून चांगली गुणवत्ता प्राप्त करून पास होणे आजच्या डिजिटल युगात महत्त्वाचे आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटक मंगल धोटे म्हणाले जी शैक्षणिक पात्रता खेड्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांकडे असते तीच शहरातील शिक्षकांकडे असते.शहरातील फक्त शाळेची वास्तू असते ती भव्य दिव्य असते एवढाच फरक असतो. 


ग्रामीण भागातील शिक्षक जेवढे मन लावून शिक्षण देतात तेवढे खाजगी आणि कॉन्व्हेंटचे शिक्षक देत नाही आणि म्हणून आपण शहराची वाट न धरता दहावीपर्यंत ग्रामीण ठिकाणीच शिक्षण घ्यावे असे त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी ग्रंथ प्रदर्शनीचे अवलोकन करून आवडेल ते पुस्तक हाती धरून वाचन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार  मेश्राम सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !