कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे साजरी.
डॉ.आनंदराव कुळे मुल शहर प्रतिनिधी
मुल : महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०-३० वाजता तालुका काॅंग्रेस कमिटी मूल तर्फे काॅंग्रेस नेते मान .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थित पदाधिकारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.
मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमवार यांनी आपल्या कार्यकाळात विदर्भ व महाराष्ट्रात अनेक विकास कामे करुन शहरी माणसांसोबत ग्रामीण माणसे जोडण्याचे कार्य कन्नमवारजीनी केले असे विचार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी आपल्या मनोगता मधून व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा कांग्रेस महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, जिल्हा कांग्रेस महासचिव व माजी सभापती घनश्याम येनुरकर, संचालक किशोर घडसे, माजी नगर सेवक बाबा अझीम,माजी संचालक डॉ. पद्माकर लेंनगूरे,ओबीसी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी
ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,सचिव शामलता बेलसरे, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, उपाध्यक्षा समता बनसोड, सीमा भसांरकर, सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार,संचालक विवेक मुत्यलवार,युवक काँग्रेसचे पदाधिकारी,कृष्णा बोरेवार, आदी काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.