पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना...जिल्हाध्यक्ष मंदिप गोरडवार,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कन्नमवार,जिल्हा महासचिव नंदलाल कन्नाके |
युनिटी प्रेस अँड मिडिया असोसिएशन,गडचिरोली तर्फे नवनियुक्त मा.जिल्हाधिकारी मा.अविश्यांत पंडा साहेब गडचिरोली सदिच्छा भेट व निवेदन सादर.
एस.के.24 तास !! मुख्य संपादक !!
गडचिरोली : दिनांक,03/01/2025 शुक्रवार ला युनिटी प्रेस अँड मिडिया असोसिएशन, गडचिरोली जिल्हाध्यक्ष मंदिप गोरडवार,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कन्नमवार,जिल्हा महासचिव नंदलाल कन्नाके तर्फे नवनियुक्त मा.जिल्हाधिकारी मा.अविश्यांत पंडा साहेब गडचिरोली सदिच्छा भेट पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,पत्रकारांच्या व सामाजिक समस्या त्वरित निराकरण करण्याबाबत व खालील विषयी...
1) आदिवासी सोसायटी व फेडरेशन द्वारा खुल्या जागेवरील घेतलेले धान्याची आठ दिवसात उचल करण्याची व्यवस्था करण्याबाबत उचल न केल्यामुळे आदिवासी सोसायटी धान्य खरेदी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीत आहे.
2) विद्यार्थ्यांना चंद्रपूर रोड व इतर मार्गावर शाळेमध्ये येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी 5 वा.च्या नंतर बस ची व्यवस्था नसल्यामुळे घरी जाण्याकरिता रात्रौ चे 8.00 वाजतात यामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होत आहे करिता बस ची व्यवस्था वाढविण्यात यावी.
3) गडचिरोली शहरात व ग्रामीण भागात होत असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्या कारवाई करण्यात यावी.
4) पत्रकारांना संरक्षण देणे, स्वतंत्र पत्रकार भवन निर्माण करणे,पत्रकारांना स्वतंत्र गृहनिर्माण योजना चालू करणे.
5) ऑनलाइन वेब न्युज पोर्टल ई - न्युज पेपर,यु ट्युब चँनल,प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया,मधील सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने अधिस्वीकृती देणे व डिजिटल मिडियातील पत्रकारांना शासकीय जाहिराती मिळणे.
6) जिल्हा माहिती कार्यालय मध्ये डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांना ग्रुपला जोडण्यात यावे.
7) गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा असलेल्या रक्त उपलब्ध साठ्यातील रक्तगटानुसार माहिती फलक लावण्याबाबत.
8) दिव्यांगाचा निराधार भत्ता वेळेवर देण्यात यावा.व दिव्यांगाचे प्रत्येक विभागातील पदे त्वरित भरण्यात यावे.
इत्यादी विषयावर चर्चा करून नवनियुक्त गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मा.अविश्यांत पंडा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे युनिटी प्रेस अँड मिडिया असोसिएशन,गडचिरोली तर्फे स्वागत करण्यात आले.
यावेळी युनिटी प्रेस अँड मिडिया असोसिएशन,गडचिरोली जिल्हाध्यक्ष मंदिप गोरडवार,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कन्नमवार,जिल्हा महासचिव नंदलाल कन्नाके उपस्थित होते.