विरूर प्रेस असोसिएशन तथा भाजपा महिला आघाडी तर्फे विरूर स्टे. येथे स्नेहमिलन हळदी कुंकू 600 महिला चा उपस्थिती कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
राजुरा : दिनांक, 16/1/2025. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अल्काजी आत्राम. कार्यक्रमाचे आयोजक भिमरावजी पाला,रामावतार सोनी,प्रदीपजी पाला,ललित कुमार सोनी.विरूर प्रेस असोसिएशन व भारतीय जनता महिला मोर्चा शाखा विरूर स्टे. च्या वतीने स्थानिक बाजार चौक जवळ मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर महिलांचा भव्य स्नेहमिलन व सांस्कृतिक प्रोग्राम व हळदी कुंकू कार्यक्रम तसेच वान वाटप करित कार्यक्रम पडला.
या कार्यक्रमाला आमदार श्री. देवरावदादा भोंगळे व सौ.अर्चनाताई भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश महामंत्री अल्का अत्राम यांच्या अध्यक्षास्थानी उपस्थितत महिलांशी सदिच्छापर संवाद साधला.
मकरसंक्रांती निमित्त आयोजित होणारे हळदी कुंकवाचे कार्यक्रम म्हणजे संस्कार आणि संस्कृतीचे सुवर्णयोग होय.अशा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे महिलांना त्यांच्या रोजराहटीच्या कामातून उसंत मिळते; त्यांच्यातील सामाजिक दृष्टीकोन उंचावण्यास व्यासपीठ उपलब्ध होतो.
आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवरावजी भोंगळे यांच्या संकल्पनेतून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भव्य महिला सांस्कृतिक महिला महोत्सवाचे ठिकठिकाणी आयोजन करतो. या माध्यमातून या भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा उद्देश आहे. आपले लोककल्याणकारी महायुती सरकार देखील महिला भगीणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने तर संपूर्ण राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याचेच काम केले आहे. यासोबतच महिलांच्या उन्नतीसाठी अशा कित्येक जिवनोत्थान योजना आज शासन आज राबवीत आहे.आपण सर्वांनी स्वत:ला सशक्त व संघटीत करून प्रगतीची कास धरावी असे प्रतिपादन आपल्या सदिच्छापर संदेशात प्रदेश महामंत्री अलका जी आत्राम यानीं केले.यानंतर तिळ-गुळ व 600 वाण वाटप करून महिलानां अल्पहार देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम उपस्थित होते तर मातंग समाजाचे प्रदेशाध्यक्ष वनिता वाटेलवार,तालुका महामंत्री सौ.यशोधराताई निरांजने,धानोरा सरपंच जोत्सना दुर्गे उपसरपंच विरुर प्रीती पवार
भाजपा महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकला रणदिवे उपाध्यक्ष मनिषा भोंगळे,उपाध्यक्ष ममता सोनी, सचिव अर्चना कस्तुरवार,पशुवैद्यकीय अधिकारी भाग्यश्री बेलसरे,प्रा.आरोग्य अधिकारी प्रियंका पिंपळकर,वाकडे मॅडम नि.शिक्षीका मंगलाताई सोनी,गीता कोटगिरवार,प्रगती उपलंचीवार,डॉक्टर वंदना उमप,संगीता सारडा
अनीता जीवतोडे,सरोजा रेड्डी,ज्योती पाला,पदमा रेड्डी नितु बिसेन,वैशाली विमलवार अरुणा ठमके,शोभा कडुकर संगीता बुरबांदे, सुनंदा मोरे, दुर्गा सुनके तर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये प्रस्तावना चंद्रकला रणदिवे यानीं केली तर नॄत्य संगीता भोस्कर वैशाली विरमलवार,दिव्यानी चौधरी,ममता सोनी,प्रिया वानखेडे कार्यक्रम आयोजक भाजपचे तालुका उपाध्यक्ष भीमरावजी पाला प्रेस असोसिएशन अध्यक्ष राम अवतार सोनी भाजपा उपाध्यक्ष जगतसिंग वधावन
भाजपा तालुका सचिव प्रदीप भाऊ पाला तालुका सचिव महामंत्री सचिन बलकी सोशल मीडिया जिल्हा संयोजक हितेश गाडगे प्रेस असोसिएशन उपाध्यक्ष जगतसिंग वधावन सचिव शामराव कस्तुरवार,प्रविन चिड़े,ललित कुमार सोनी,पंकज उपलंचीवार,रामा खोब्रे अविनाश गोगुलवार,तुषार मोरे,एंथोनी गोगुलवार,किशोर कडुकर यांच्या आयोजनाने कार्यक्रम पार पाडला.कार्यक्रमाचे संचालन कॉलेज प्रिंसिपल सौ.रेणुका कुंभारे यानीं केले.