सबसिडी च्या नावावर शेकडो आदिवासींची फसवणूक ; घोटाळेबाज मागील 6 महिन्यांपासून फरार. ★ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील मारोती नैताम आरोपीस अटक.

सबसिडी च्या नावावर शेकडो आदिवासींची फसवणूकघोटाळेबाज मागील 6 महिन्यांपासून फरार.


गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील मारोती नैताम आरोपीस अटक.


एस.के.24 तास


भंडारा : ९० टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून ३ लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला असून घोटाळेबाजाला पोलिसांनी अटक केली आहे.८ ते १० लाख किमतीचा ट्रॅक्टर ९० टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून ३ लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजाच्या विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हा घोटाळेबाज मागील सहा महिन्यांपासून फरार होता. भंडारा पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत अखेर या घोटाळेबाजाला गडचिरोलीतून अटक केली आहे.पुढे आलेल्या माहितीनुसार,भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यातचं नव्हे तर, या घोटाळेबाजाने राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातही जाळे पसरवून नागरिकांकडून कोट्यवधींची फसगत केल्याचं आता समोर आले आहे.


मारोती अशोक नैताम वय,35 वर्ष असे कोट्यवधींने नागरिकांना फसविणाऱ्याचं नावं आहे.तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील रहिवाशी आहे.उच्च शिक्षित असलेल्या मारोती नैतामला मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण नऊ भाषा बोलता येतात.त्यासोबतचं त्यानं नैतान या आडनावाचा गैरफायदा घेतला.नैताम हे आडनाव आदिवासींमध्ये आहे, मात्र हा ओबीसी (तेली) समाजाचा असतानाही त्यानं आदिवासी बांधवांना तो स्वतः आदिवासी असल्याचं सांगून आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन केला.

तसेच या घोटाळेबाजाने भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चिचोली येथे जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर लिमिटेड नावानं कंपनी स्थापन करून नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक केली. सबसिडीवर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी अनेकांनी त्यांचे दागिने गहाण ठेवलेत.

अनेकांनी शेती विकल्या तर काहींनी कर्ज घेऊन या ट्रॅक्टरसाठी या कंपनीत पैसे गुंतविले होते. आता हा घोटाळेबाज पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून भंडारा पोलीस त्याची चौकशी करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !