सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार ; 3 जणांना अटक सरपंच फरार.
एस.के.24 तास
सिरोंचा : जंगलात रात्री चितळाची शिकार करुन विल्हेवाट लावण्यासाठी लगबग सुरू असताना अचानक वनविभागाने पथकाने धाड घातली असता सरपंच फरार झाला तर मोठ्या शिताफीने तिन इसमास अटक करण्यात आली आहे.
सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार केल्याची घटना ८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली.वनविभागाने यातील आरोपींचा शोध घेतला असता या घटनेत वडधमच्या सरपंच व अन्य दोघांचा समावेश आहे.तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
3 आरोपींना अटक करण्यात आली असून,सरपंच फरार आहे.समय्या किष्टय्या सिंगनेनी (सरपंच पोचमपल्ली), सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी, राजेश्वर सवेश्वर आकुला (सर्व रा. वडधम) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश्वर,सवेश्वर व राकेश यांना अटक करण्यात आली आहे.
तर सरपंच समय्या हा फरार आहे. ८ मार्च रोजी वनविभागाचे पथक गस्तीवर असताना वडधम गावात विद्युत लाइन ट्रीप झाल्याचे लक्षात आले तेव्हा अनुचित घटनेचा संशय आला.गावात चौकशी केली असता जंगलात वन्यप्राण्यांची विद्युत तारेचा स्पर्श लावून शिकार केल्याची माहिती मिळाली.
वनकर्मचारी शिकार झालेल्या ठिकाणाचा शोध घेतअसताना राजेश्वर सवेश्वर आकुला हा दिसून आला. त्याचवेळी राजेश्वरच्या भ्रमणध्वणीवर शिकारसंदर्भात फोन आला.तेव्हा त्याला अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की गोदावरी नदीपात्रापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावरील जंगलात शिकार झाली.त्याला सोबत घेऊन शिकारीचा शोध घेत असताना वाटेत चितळाचे शिर मिळून आले. समोर काही इसम दिसून आले.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली.प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.सुरपाम करीत आहेत.ही कारवाई वनपाल डी.बी.आत्राम, वनरक्षक आर. वाय.तलांडी, डी.यु.गिते, एस.एस.चौधरी,व्ही.ए.काटींगल,आर. के.आत्राम यांनी केली.नदीपात्र ओलांडून आरोपींना केली अटक
वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत गोदावरी नदीपात्र ओलांडून सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी यांना ताब्यात घेतले. समय्या किष्टय्या सिंगनेनी फरार होण्यात यशस्वी झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आला नाही.