नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक व सफाई कामगार पदासाठी 35 हजारांची लाच घेतांना मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्याला नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
नागभीड : जिल्ह्यात लाचखोरांचा सुळसुळाट वाढला असून नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक या पदाच्या भरतीसाठी 25 हजार तर सफाई कामगार पदासाठी एका महिलेकडून 10 हजार रूपये अशी 35 हजारांची लाच स्वीकारताना अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीचे संचालक नंदकिशोर पंजाबराव गवारकर वय,61 वर्ष यांना नागपुरच्या पथकाने अटक केली आहे.
नागपुर येथील नंदकिशोर गवारकर यांच्या अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीकडे नागभीड च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट आहे.
तक्रारदार यांना शिल्पनिदेशक म्हणून तासिका तत्वावर नियुक्ती पत्र देण्याकरता २५ हजार रुपये तर एका महिलेला कंत्राटी सफाई कामगार पदासाठी नियुक्तीपत्र देण्याकरिता १० हजार असे एकूण ३५ हजार रूपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारून खाजगी ड्रायव्हर याचेकडून मोजून घेऊन स्वतःचे डावे बाजूचे टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली.
गवारकर यांना रंगेहाथ पकडून लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई नागपुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.