सावली तालुक्यातील सोनापूर येथील 2 चिमुकल्या मुलीसह वडील बेपत्ता ; सावली पोलिसांचे शोधकार्य सुरू.


सावली तालुक्यातील सोनापूर येथील 2 चिमुकल्या मुलीसह वडील बेपत्ता ; सावली पोलिसांचे शोधकार्य सुरू.


एस.के.24 तास

सावली : सावली पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूर येथील शिवण्या वय 8 वर्ष व यशिका वय 5 वर्ष या चिमुकल्या मुलींना मंगेश भांडेकर हा वडील घेऊन 31 डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार आजी आजोबा यांनी सावली पोलिसात दिली. या तक्रारीवरून सावली पोलिसांनी शोधकार्य सुरु केले असून एक पथक रामटेक नागपूर येथे जाऊन आले आहे.

        


मंगेश भांडेकर या व्यक्तीला दारूचे व्यसन असून पत्नी, आई, वडील यांना नशेत अनेकदा मारहाण करीत असे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून पत्नी आशा मंगेश भांडेकर ही चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे मुलींसह माहेरी राहत होती. 



मात्र मोठ्या मुलीची शाळा असल्याने ती आजी आजोबाकडे सोनापूर येथे राहत होती. आई रोवणीच्या कामाला तेलंगणा येथे गेली असता लहान मुलीला घेऊन आला व 31 डिसेंबर ला दोन्ही मुलींना घेऊन बेपत्ता झाला आहे.दारूच्या नशेत नेहमी राहत असल्याने व कुठे आहे याची माहिती नातेवाईकांना दिला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.



मुलींची आई नसल्याने आजी आजोबा यांनी गुरुवारी पोलीस स्टेशन सावली येथे तक्रार दिली. तर आई आशा मंगेश भांडेकर हिने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालयात सदर तक्रार दिली आहे.गावातील काही महिला शनिवारी रामटेक येथे देव दर्शनाला गेले असता तिथे मुलींसह मंगेश आढळला होता. 



ही माहिती पोलिसांना होताच सावली पोलीस रविवारी आजोबांना घेऊन रामटेक गाठले मात्र तिथे पता लागला नाही.मुलींचा पत्ता लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

 

बाल संरक्षण विभागाची टीमही शोधकार्यास लागली असून रामटेक येथे पाहणी केल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अभिषेक मोहुर्ले यांनी आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !