सावली येथे सद्भावना क्रिकेट स्पर्धा 2025 संपन्न.
★ महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्टेशन सावली च्या वतीने संत नारायण बाबा मठ मैदानावर सद्भावना क्रिकेट स्पर्धा आयोजित स्पर्धेचे तिसरे वर्ष.
सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली : या सद्भावना क्रिकेट स्पर्धेत सावली तालुका पत्रकार संघ, पोलीस स्टेशन सावली, पंचायत समिती सावली, तहसील कार्यालय सावली, ग्रामीण रुग्णालय सावली, MSEB, व्यापारी असोसिएशन सावली,सावली आपदा संघ इत्यादी संघांनी सहभाग घेतला.त्यात मागच्या वर्षी प्रमाणे पंचायत समिती सावलीच्या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात पोलीस स्टेशन सावलीचा पराभव करून सद्भावना चषक आपल्याकडे कायम राखला.
यावेळी विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला सद्भावना क्रिकेट चषक मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून देण्यात आला,पंचायत समिती संघाचे खेळाडू आमिर पठाण यांना उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून चंद्रशेखर गुरूनुले यांना चषक देण्यात आला.
यावेळी मंचावर तहसीलदार सावली मा.प्रांजली चीरडे मॅडम, सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. प्रदीप पुल्लूरवार साहेब,पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रासकर साहेब, सहाय्यक वनसंरक्षक खेडीकर साहेब,उपाध्यक्ष संदीपभाऊ पुण्यपकार, नगरसेवक विजयभाऊ मुत्यालवार, नगरसेवक सतीशभाऊ बोम्मावार, नगरसेवक प्रफुल वाळके, पत्रकार उदय गडकरी,पत्रकार सूरज बोम्मावार, प्रवीण गेडाम उपस्थित होते.
सर्व सामन्यात स्कोरर म्हणून प्राध्यापक विजय गायकवाड सर, नगरसेवक प्रीतम गेडाम,धर्मेश बोरकर सर यांनी काम बघितले.समालोचन रोशन बोरकर, पोलीस पाटील खोब्रागडे, प्रवीण गेडाम यांनी केले तर पंच म्हणून आकाश बरीवार आणि राजू बरीवार यांनी आपली महत्वाची भूमिका बजावली, सावली पोलीस स्टेशनचे कर्मचारी धीरज पिदूरकर आणि मोहन दासरवार यांनी संपूर्ण सामन्याचे उत्कृष्ठ पद्धतीने आयोजन केले.