बहेलिया शिकाऱ्यांचा म्होरक्या अजित राजगोंड च्या अटकेनंतर वाघांच्या शिकार प्रकरणात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला शिलाँग येथून अटक करून राजुरा येथे आणले.
★ 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शिकार केलेल्या वाघाची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणाशी त्याचा संबंध असण्याची शक्यता.
एस.के.24 तास
चंद्रपूर : बहेलिया शिकाऱ्यांचा म्होरक्या अजित राजगोंडच्या अटकेनंतर वाघांच्या शिकार प्रकरणात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला शिलाँग येथून ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.आसाम रायफल मधून तो 2015 साली सेवानिवृत्त झाला.या अधिकाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात वाघाच्या अवयवांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे.
अजित राजगोंडा उर्फ अजित पारधी याला 25 जानेवारी ला राजूरा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि 26 जानेवारीला त्याला अटक करण्यात आली. अजितसोबत त्याच्या कुटुंबीयांना देखील अटक करुन 6 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.वनकोठडीत वाघांच्या शिकारी बाबत अजित कडून सत्य वदवून घेण्यात मात्र वनाधिकारी अपयशी ठरले.
त्याच्या भ्रमणध्वनीचा तपशील तपासला असता वाघांची शिकार, अवयवांच्या विक्रीचे धागेदोरे थेट गुवाहाटीपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गुवाहाटी येथे गेले.चौकशी दरम्यान एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे नाव समोर आले. त्यामुळे ही चमू गुवाहाटीवरुन शिलाँग येथे पोहोचली व सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ताब्यात घेतले.शुक्रवारी त्याला घेऊन ते राजूरा येथे पोहोचले.
अजितच्या भ्रमणध्वनीवरुन सुमारे 70 लाख रुपयांचा व्यवहार हा याच अधिकाऱ्याशी झाल्याचे सांगितले जात आहे.यासंदर्भात विचारणा करण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
यापूर्वी 2023 मध्ये देखील आसाम येथून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले होते.कातडी गडचिरोली जिल्ह्यातून शिकार केलेल्या वाघाची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणाशी त्याचा संबंध असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
जप्त अवयव वाघाचेच असल्याचे स्पष्ट : -
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान अटकेच्या ठिकाणाहून जप्त केलेले केस, हाडाचा तुकडा, मोठा दात याचे नमुने गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात विश्लेषणसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आला असून ते वाघाचेच असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व आरोपींच्या वनकोठडीत चार फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली. एक महिला आरोपी राजकुमारी हिला पोलीस कोठडी देण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासणीसाठी ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्राचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू यांच्या नेतृत्त्वात तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीने शिलाँग येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या सहकार्याने लाललीसंग नावाच्या संशयिताला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.अखेर आज अटक करण्यात आली.
वन कोठडीत 4 फेब्रुवारी पर्यंत वाढ : -
संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान अटकेच्या ठिकाणाहून जप्त केलेले केस,हाडाचा तुकडा, मोठा दात याचे नमुने गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात विश्लेषणसाठी पाठवण्यात आले.हा अहवाल आला असून ते वाघाचेच असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान या सर्व आरेापींच्या वनकोठडीत चार फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली. तर एक महिला आरोपी राजकुमारी हिला पोलीस कोठडी देण्यात आली.या प्रकरणाच्या तपासणीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्राचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू यांच्या नेतृत्त्वात तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली.
या समितीने शिलाँग येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या सहकार्याने लाललीसंग नावाच्या संशयिताला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यांना 31 जानेवारी ला अटक करण्यात आली व चार फेब्रूवारीपर्यंत वनकोठडी मिळवण्यात आली.