सावली - मुल महामार्गावरील खेडी ते गोंडपिपरी फाट्यावर अवैध जनावर वाहतूक करणारे 2 पिकअप पकडले सावली पोलिसांनी पकडले.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,04 /01/ 2025 रोजी पहाटे च्या दरम्यान सावली पोलीस स्टेशनं चे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन पिकअप मध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी खेडी फाटा मार्गे चंद्रपूर आंध्रा मार्ग जात असल्याची
गोपनीय माहिती मिळाल्याने सावली पोलिस पथक खेडी फाटा येथे नाकाबंदी करून सदर दोन पिकअप थांबवून तपासनी केली असता त्यात 17 नग गाई व बैल गोवंश जनावरे कोंबून वाहनात भरून गोवंश जनावराचे पाय बांधून कत्तली करिता वाहतूक करीत असतांना मिळून आले.
सदर 17 नग गोवंश जनावरांना हळदा येथे फाउंडेशन दाखल करण्यात आले.पोस्टे सावली येथे महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम सह कलम ५(अ),९,११ प्रण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कारवाई ठाणेदार,प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मुसळे,पो.हा.संजय शुक्ला,पो.हा.विनोद निखाडे,पो.शी.चंद्रशेखर गपंलवार,चालक जिवतोळे,चालक अमोल जांभुळे,गुरुदास गेडाम,नेपोलियन मेश्राम,यांनी केली