14 वर्षांची मुलगी 3 महिन्यांची गर्भवती.
एस.के.24 तास
नागपूर : सक्करदरा परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचे घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलासोबत सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाच्या सीमा ओलांडली. ती मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाली. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही मध्यप्रदेशात पळून गेले.
खिशातील पैसे संपले आणि दोघेही घराकडे परत आले. आईच्या तक्रारीवरुन मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हटल्या जाते. परंतु, अगदी खेळण्याबागळण्याच्या वयात मुले-मुली प्रेमात पडत असल्यामुळे पालक वर्ग चिंतेत आहे. सध्या शाळकरी मुले-मुलींमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वयाचा विचार न करता किंवा प्रेमाची परिभाषा समजून घेता केवळ शारीरिक आकर्षणापोटी मुले-मुली एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहे.
अशाच प्रकारची घटना नागपुरातील सक्करदरा परिसरात उघडकीस आली आहे.सागर (१६) आणि श्रृतिका (१४, बदललेली नावे) हे दोघेही एकाच वस्तीत राहतात. श्रृतिकाने ही आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे आईवडिल मोलमजुरी करतात. ती शाळेत जात असताना वाटेवर घर असलेल्या सागरशी तिची ओळख झाली. यानंतर दोघेही एकमेकांशी बोलायला लागले.
त्यानंतर दोघांची मैत्री झाली. दोघांचाही संपर्क वाढला. सागरने श्रृतिकाच्या आईचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलायला लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. एप्रिल महिन्यांपासून सुरु असलेले प्रेमप्रकरण लग्नाच्या आणाभाका घेईपर्यंत पोहचले.