प्रा.आ.केंद्र पाटण येथे 100 दिवसीय टिबी मुक्त अभियान
100 हून अधिक महिलांना हळदी कुंकवाच्या माध्यमातून केले जागरूक. - डॉ.कविता शर्मा यांची अभिनव कल्पना
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या आरोग्य विभाग मार्फत 100 दिवसीय टीबी मुक्त अभियान राबविण्यात येत असून भारतातून पूर्ण पणे टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यामध्ये दिल्लीपासून तर गल्ली पर्यंत प्रत्येक वेक्तीला टीबी हा आजार कसा थांबविता येईल यासाठी मार्गदर्शन केले जात आहेत.
यासाठी मार्गदर्शन पर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता शर्मा यांनी आपल्या अभिनव कल्पनेतून चक्क महिलांना हळदी कुंकवाच्या माध्यमातून एकत्र करून थेट टीबी आजाराबाबत मार्गदर्शन केले. आणि महिलांना तीळ गुळ घ्या टीबी संपवा असे लिहून असलेले पतंग देऊन समाजात जागरूकता निर्माण केले.
सदर 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉपटले सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.टेंबे सर, टीबी सुपरवायझर एस टी स बर्डे सर यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ कविता शर्मा आणि त्यांच्या टीमने यशस्वी केले.