मंडई च्या नावाने चातगाव येथे अवैध लाखोचा जुगार व कोंबडा बाजार जोरात ; गावात मंडई नाही पण जाणूनबुजून 10 युवकांनी उभारली अशी चर्चा.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,15/01/2025 बुधवार ला 2:39 वा.धानोरा तालुक्यातील चातगाव येथे मंडई च्या नावाने मोठ्या प्रमाणात अवैध कोंबडा बाजार व चक्री आणि झंडीमुंडी जोरात लाखोंचा जुगार सुरू आहे.पोलीस स्टेशन च्या हद्दीत लागून गावानजीकच्या तलावाजवळ खुलेआम सुरू आहे.तिथे 10 युवकांचे मंडळ द्वारे कोंबडा बाजार साठी परवानगी घेण्यासाठी लाखोंचा रुपये चा खर्च केल्याचे एक युवक सांगत होता 25 डिसेंबर पासून परवानगी साठी फिरलो.पण काल सायंकाळी परवानगी मिळाली असे चर्चा सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध धंदे व्यवसायाला आळा घालून कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सर्वच पोलीस स्टेशन ला दिली आहे.असे असताना मात्र जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील चातगाव येथे भरवण्यात येणाऱ्या अवैध कोंबडा जवळच गावतलाव जवळ जोरात सुरू होता.
पोलीस स्टेशन चे अधिकारी या कोणाचीच दूरदृष्टी पडली नसेल का ? त्याकडे पोलीस अधिकारी भिरकुन सुध्दा बघितले नाही का ? अवैध कोंबडा बाजाराला कोणाचे पाठबळ ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र कोंबडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे.मात्र या ठिकाणी बेधडक पणे हा बाजार भरवला होता.या कोंबडा बाजार शौकीन सातशे ते आठशे संख्येने कोंबडा बाजारात गडचिरोली पासून ते आजूबाजूच्या परिसरातील कोंबडे लढवण्यासाठी आले होते.मोठ्या प्रमाणात कोंबडा बाजारातून महसूल गोळा जमा होत असल्याचे बोलल्या जात आहे.
मंडई च्या नावाने हा कोंबडा बाजार गावातील 10 युवक मिळून भरवल्या गेल्याचे चर्चा आहे. आपल्या वर अनेकांचा आशीर्वाद असल्याने कोणीही कारवाई करू शकत नाही.असे कोंबडा बाजार भरवणाऱ्या मंडळातील युवक बोलत होता.