आ.रामदास मसराम यांच्या विजयी मिरवणुकित कांग्रेस च्या कार्यकर्त्यांनी चक्क भाजप पदाधिकार्याच्या घरावर चढून फटाके फोटले ; 7 जणांवर गुन्हा दाखल.

आ.रामदास मसराम यांच्या विजयी मिरवणुकित कांग्रेस च्या कार्यकर्त्यांनी चक्क भाजप पदाधिकार्याच्या घरावर चढून फटाके फोटले ; 7 जणांवर गुन्हा दाखल.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक              


वडसा : देसाईगंज विधानसभा निवडणुकित कॉंग्रेस उमेदवार आमदार रामदास मसराम यांनी विजय मिळविला त्यामुळे ठिकठिकाणी विजयी मिरवणुका काढण्यात आल्यात माञ विजयाचा उन्माद देसाईगंज तालुक्यातिल बोडधा या गावात निराळाच अनुभव पहावयास मिळाला.


विजयी मिरवनुकिचे औचित्य साधुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकार्याच्या घरावर चढुन चक्क सुतळी बॉम्ब फोडल्याची धक्कादायक घटना घडल्याचे प्रकार उघडकिस आले असुन पोलिसात प्रकरण दाखल होऊन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


 सविस्तर वृत्त असे की आरमोरी विधानसभा निवडणुकित कॉंग्रेस उमेदवार रामदास मसराम यांनी विजय संपादन केला संपुर्ण विधानसभेत कॉंग्रेस पदाधिकार्यांकडुन विजयी मिरवनूका काढुन जल्लोष साजरा करण्यात आला.


माञ देसाईगंज तालुक्यातिल बोडधा याठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उन्मादाचा कळस गाठला , भाजपचे वयोवृद्ध पदाधिकारी तथा किसान आघाडी चे तालुका अध्यक्ष केवळराम झोडे यांच्या घराच्या दारासमोर तसेच बेडरुम च्या खिडकी जवळ आणि स्लाब वर चढुन काही कार्यकर्त्यांनी चक्क सुतळी बॉम्ब फोडले.


त्यामुळे झोडे दाम्पत्य हादरुण गेले हा प्रकार २३ नोव्हेबर च्या रात्रौ १० चे सुमारास घडला. पराग गायकवाड,रोहित गायकवाड,पवन गायकवाड या युवकांनी संरक्षण भिंत चढुन दरवाज्या समोर बेडरुम च्या खिडकी जवळ आणि स्लैब वर चढुन फटाके फोडले गाढ झोपेत असलेले झोडे दाम्पत्य हादरुण घराच्या बाहेर येताच बाहेर उभे असलेले उद्धव गायकवाड,नेताजी गहाने,होमराज गायकवाड व हेमराज काशिनाथ गायकवाड यांनी अश्लिल हातवारे करुन केवळराम झोडे व त्यांच्या पत्निला मानसिक ञास दिला.


या संदर्भात वरील ७ आरोपीं विरोधात देसाईगंज पोलिसांत ७९ , ३२९(४) , १८९ (२) १९१ (२ ) १९० , ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पो नि अजय जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा पो.नि.संदिप आगरकर अधिक तपास करित आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !