अ-हेरनवरगांव येथील तमाशा फळातील शाहीर,नाच्या, तुणतुणा,ढोलक्या,नकलाकार व अन्य कलाकारांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत राष्ट्रीय दुय्यम तमाशाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी - २९/१२/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे पहिल्यांदाच गावातील मृत पावलेले बकाराम जी दाणी, नानाजी उरकुडे, सुखदेव ठाकूर, पंढरी बेंदेवार,अभिमान ठेंगरे ,हिरालाल ठेंगरे ,उत्तम मैंद, महादेव दोनाडकर, रामदास मेश्राम, तुकाराम तूपट,महादेव गुडी मेश्राम, राजिराम बेंदेवार,प्रभाकर ठेंगरे, संपत राऊत ,अर्जुन ठेंगरे व अन्य या तमाशा शौकीन शाहीर
नाच्या, नकलाकार, ढोलक्या, तूणतुणाआणि अन्य साथी कलाकार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना तमाशाच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरता पहिल्यांदाच नववर्षाच्या पर्वावर दिनांक ०१ जानेवारी २०२५ ला राष्ट्रीय दुय्यम तमाशा चे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
शाहीर छत्रपती ऊके साथी सौ.संगीता व पार्टी गुरुकृपा कलगी संच सलंगटोला तालुका अर्जुनी विरुद्ध शाहीर भीमराव दिघोरे साथी गोविंदा भोयर जय तुर्रा गायन पार्टी भालेश्वर यांचा ग्रामपंचायत बाजार चौक च्या पटांगणात दुय्यम तमाशा होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमाला गावातील व परिसरातील तमाशा प्रेमी बंधू आणि भगिनींनी उपस्थिती दर्शवून लोप पावत असलेल्या या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी व तमाशा प्रेमी मृत पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे गावातील तमाशा आयोजक समितीचे कार्यकर्ते,श्री.वामन भाऊ मिसार ,ईश्वर कुथे, धनराज मेश्राम , प्रशांत दानी, होमराज राऊत तंटामुक्ती अध्यक्ष, देवलाल ठेंगरे, राजू वकेकार, सुरेश ठेंगरे व समस्त गावकरी मंडळी यांनी आव्हान केले आहे.