बि.एस.पी.च्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक आरमोरी रोडवरील हायवे ला एक ते दीड फुटाचे खड्डे पडले असल्यामुळे जनतेला ये जा करण्याकरिता अत्यंत त्रास होत आहे . खड्डे चुकवण्याच्या नादात एक्सीडेंट होऊन जीवन हानी होण्याचे संकेत खड्डे देत आहेत.त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावे याकरीता बहुजन समाज पार्टी गडचिरोली च्या वतीने माननिय संजय दैनै साहेब जिल्हाधिकारी गडचिरोली यांना बहुजन समाज पार्टी तर्फे नि वेदन देण्यात आले.
याकरिता भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी, सुधीर जी वालदे विधानसभा प्रभारी, मायाताई मोहरले महीलांजिल्हाध्यक्ष, सुमन ताई कराडे ज्येष्ठ कार्यकर्ते बीएसपी, कविता वैद्य शहर उपाध्यक्ष, सिद्धार्थ दुधे,विकास लाडे, सदर कार्यकर्ते उपस्थित होते.