सरपंच संतोष देशमुख हत्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन ; सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

सरपंच संतोष देशमुख हत्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन ; सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. 


राजेंद्र वाढई : उपसंपादक


राजुरा : बीड मधील केज तालुक्यातील मस्साजोग या गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर यांचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. 


या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन सरपंच संघटनेकडून दिनांक ३१ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान करण्यात येणार आहे. आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे लवकरात लवकर आरोपींना अटक करून फाशी देण्यात आली पाहिजे अशी मागणी सरपंच संघटने कडून करण्यात आली आहे. 


संतोष देशमुख यांनी ग्राम मसाजोग येथे अनेक उपक्रम राबवली त्याचबरोबर ग्रामपंचायतीला विकास कामाच्या संदर्भात अनेक पुरस्कार प्राप्त करून दिले. गाव विकास करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले गाव आदर्श सुंदर स्वच्छ व पर्यावरण पूरक करण्याचा प्रयत्न केला समाजा प्रती आदर निर्माण केला. 

        

अशा या आदर्श सरपंचाची हत्या करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून या मागचा मास्टर माईंड कोण याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे सचिव ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराडे, विदर्भ अध्यक्ष अँड.देवा पाचभाई यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून आरोपीस तात्काळ अटक न झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायतचे सरपंच संघटने कडून दिनांक ३१ डिसेंबर ते २ डिसेंबर २०२४ पर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येईल.


 अशी माहिती चंद्रपूर जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई  दिली आहे. 


गावगाडा चालवणारा सरपंच हा ग्राम विकासाचा कणा असुन पंचायत राज व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सरपंच हा २४ तास जनतेच्या सेवेत राहणारा एकमेव पुढारी आहे आणि अशा जनसेवकांची निर्घृण हत्या केली जाते. हे वेदनादायी आहे. खासदार, आमदार  यांना पोलिस सुरक्षा असते मात्र खऱ्या अर्थाने जनतेची सेवा निर्भीडपणे करणाऱ्या सरपंचाची सुरक्षा लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कठोर अनुशासनात्मक कार्यवाही करून गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे असे मत कळमनाचे सरपंच तथा महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !