जन शिक्षण संस्थान, गडचिरोली द्वारा कोरची,धानोरा,वडसा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिवार्ण दिन साजरा.
★ " सौन्दर्य प्रसाधन " प्रशिक्षण केंद्र,कोंढाला,वडसा येथे उदघाटन संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 6 डिसेंबर 2024 रोज शुक्रवार ला मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक,जन शिक्षण संस्थान, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर महा मानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 'महारीनिवार्ण दिन साजरा करण्यात आला.यावेळी कोरची,धानोरा,वडसा येथे जन शिक्षण संस्थान, गडचिरोली व गावाकऱ्यांच्या संयुक्त विद्यामाने प्रशिक्षक व प्रशिक्षनार्थी यांच्या माध्यमातून " महापरीनीर्वाण दिन " साजरा करण्यात आला.
दिनांक 06 डिसेंबर ला मौजा कोंढाळा ता.वडसा येथे जन शिक्षण संस्थान,गडचिरोली कौसल्य विकास व उद्योजगता मंत्रालय,भारत सरका शिक्षण संस्थान, गडचिरोली अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच आज कोंढाळा येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचेस चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मा.श्री.गजानन सेलोटे उपसरपंच ग्रा.प.कोंढाळा,श्री.निखिल गोरे पंचायत राज फेलो, श्री. बेहरे सर प्रतिष्ठीत नागरीक, श्रीमती राऊत मॅडम ग्रामसेविका, श्री.प्रदीप तुपट लिपिक ग्रा.प.कोंढाळा, श्रीमती यामिनी मातेरे मॅडम फील्ड असिस्टंट जन शिक्षण संस्थान गडचिरोली,श्रीमती ज्योती उके मॅडम ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रशिक्षिका आणि आपल्या या बॅचेस मधील विदयार्थी वर्ग उपस्थित होते.
कोरची येथे श्रीमती सुनीता मोहुर्ले,ममता सुखदेवे,सौ. आशा गुरव,रुपाली टेम्भूर्णे इत्यादी प्रशिक्षिका व धानोरा येथे सौ.पिंकी भैसारे, वेणू मशाखत्री प्रशिक्षिका व विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता जन शिक्षण संस्थान चे कर्मचारी, प्रशिक्षक व विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.