जि.प.उच्च प्रा.शाळा जामखुर्द येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.
कमलाकर बुरांडे - प्रतिनिधी,पोंभूर्णा
पोंभूर्णा : पोंभुर्णा- मूल सीमेवर असलेल्या जामखुर्द येथील जिं. प. प्रा. शाळेत ६८ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कारकीर्दीत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे तसेच आपल्या लेखणीतून समाजासाठी, गोर गरीब मागासवर्ग,महिला,शेतकरी कामगार वर्ग,नोकरवर्ग किंबहुना संपूर्ण देशासाठी राज्यघटना लिहून सर्वांना आपले अधिकार प्राप्त करून दिले.असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.कमलाकर बुरांडे, उपाध्यक्ष वैशाली मडावी, सदस्य जयश्री देवतळे व सर्व सदस्यगण तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गेडाम सर सहा. शिक्षक रहांगडाले सर,मेश्राम सर, कहुरके सर आदींनी अभिवादन केले.