आश्रम शाळा जांभूळघाट येथे निरोप समारंभ.
एस.के.24 तास - तालुका प्रतिनिधी
चिमुर : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांभूळघाट येथिल पदोन्नतीने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कडिकसा प्रकल्प देवरी येथे स्थानांतरण झालेले श्री. मनोहर मेश्राम यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती मनोहर मेश्राम यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत गिरी यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. रंजना मांडवे, कु. सुचिता घुले, अजय सोनुले, निवृत्ती पिसे, लिलाधर पिसे, कु. शुभांगी ढवळे उपस्थित होते.
नेहमी प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे, शिस्तप्रिय वर्गशिक्षक आम्हाला सोडून जात असल्याने मनस्वी दुःख होत असल्याचे वक्तव्य मेश्राम सर वर्गशिक्षक असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. प्रशासकीय बाबतीत योग्य मार्गदर्शन करणारे, वडिलधारी भुमिका निभावत सर्वांना सांभाळून नेणारे सहकारी सोडून जात असल्याची खंत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन व्यंकट चाचरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अश्विनी मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपाली नन्नावरे, शितल नागपुरे, स्वाती डांगे,सुरेश फुलझेले,अनिल सावळकर, अनिल निरंजने इत्यादींनी मेहनत घेतली.