अ-हेरनवरगाव ते ब्रह्मपुरी रस्त्याच्या मधोमध जीव घेणे खड्डे तयार ; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०९/१२/२४ अ-हेरनवरगांव ते ब्रह्मपुरी नव्यानेच अंदाजे दोन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण करून प्राथमिक उपचार म्हणून दीड इंची बोल्डर वरती डांबर टाकून चुरी ने झाकुन कच्चा स्वरूपाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठेकेदाराच्या मार्फतीने केले आहे.
सदर रस्ता बांधकामाला पाच,सहा महिन्याचा कालावधी झाला असून पक्के डांबरीकरण करण्यात आलेले नाही . शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर नेण्यासाठी व शेतातून ट्रॅक्टर घरी नेण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या धान चुरण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. रस्त्यावरती कच्च्या स्वरूपाचे बांधकाम असल्यामुळे शेतामधून धानाचे पोते भरून तथा तनशीची ट्रॉली भरून ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर चढवताना ट्रॅक्टर चालकाला जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर चढवावे लागते.
ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर चढवीत असताना ट्रॅक्टरचे समोरचे दोन्ही चाक वर उभे होतात आणि मागचे चाक स्लिप मारून रस्त्याच्या मधोमध मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्याच्या मध्यभागी खोल खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांचे दोन चाकी, चार चाकी वाहन खड्ड्यात गेल्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.अपघाता प्रसंगी वाहन चालकाला वाहनाची तोडमोड, आपले प्राण गमवावे लागते.
तरी अ-हेरनवरगांव पासून दीड किलोमीटर अंतरापासून तयार झालेल्या नवीन कच्या रस्ता बांधकामावर रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे संबंधित बांधकाम विभागाने अथवा ठेकेदाराने बुजवून अपघाताचा होणारा धोका टाळावा आणि शक्य तितक्या लवकर सदर रस्त्याचे बांधकाम पक्के करावेअशी पिंपळगाव,अ-हेरनवरगांव, भालेश्वर या गावातील नागरिकांची मागणी आहे.