ने.हि.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ; बुध्दवंदना व अभिवादन कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०६/१२/२०२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारवंत विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
सर्वप्रथम प्राचार्य कक्षासमोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एच गहाणे व अधीक्षक संगीता ठाकरे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर उपस्थित डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ प्रकाश वट्टी,डॉ राजू आदे,प्रा बालाजी दमकोंडवार,प्रा रुपेश वाकोडीकर,प्रा आकाश मेश्राम,डॉ कुलजित शर्मा,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ ज्योती दुपारे,प्रा ठोंबरे,प्रा खोब्रागडे,प्रा. पराते, रुपेश चामलाटे,
शशिकांत माडे,सुषमा राऊत, दत्तू भागकर, निनावे,माणिक दुपारे इत्यादींनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली.यानंतर ग्रंथालयातील बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून बुध्दवंदनेचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मोठया संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.सर्वांनी बाबासाहेबांना पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.
यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा, डॉ खानोरकर, डॉ मेश्राम,प्रा धिरज आतला जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.