परभणी येथील संविधानाची प्रत फाडणाऱ्या व्यक्तीवर व सोमनाथ सुर्यवंशी च्या मारेकऱ्यावर कडक कारवाई करा. - कुरखेडा तहसिलदारांना रिपाईचे निवेदन.
मुनींश्वर बोरकर - गडचिरोली
कुरखेडा : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर संविधानाची प्रत फाडणाऱ्या समाजकंटक माथेफिरू व सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी नेत्यांला अमानुषपणे मारहान केल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला त्यामुळे अश्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी व आंबेडकरी जनतेवर करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यात याव्यात.
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावेत या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसिलदार कुमरे कुरखेडा यांना निवेदन देण्यात येऊन आंबेडकरी जनतेच्या भावना शासनापर्यंत कळवावे अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.
तहसिलदार कुमरे यांना निवेदन देतांना रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , कुरखेडा तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे , मोहनदास मेश्राम , मोरेश्वर राऊत , अशोक पुडके , देवाजी सरदारे , मुरली कसारे , अनिल बांबोळे , ताराचंद नंदेश्वर , समता सैनिक दलाचे मुक्ताजी दुर्गे , अशोक अंबादे, डॉ.अनिल वाघमारे , जालंदर बोदेले ,किशोर कऱ्हाडे , अग्रज क-हाडे, सुधाकर जांभुळकर , भिमराव सोरते , सतिश राऊत , बालविर बोदेले , बालकदास भानारकर , डोमाजी नंदेश्वर , अनिल सहारे , शामराव लाळे , भिमराव इंदुरकर ,आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
,