गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी, अविनाश भांडेकर.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश भांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.प्रेस क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी अविनाश भांडेकर, उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव रूपराज वाकोडे, सहसचिव सुरेश नगराळे,कोषाध्यक्ष शेमदेव चापले आदींची निवड करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य म्हणून सुरेश पद्मशाली,नंदकिशोर काथवटे, मिलिंद उमरे,निलेश पटले,विलास दशमुखे, मनोज ताजने सहयोगी सदस्य म्हणून नंदकिशोर पोटे, आशिष अग्रवाल,इरफान शेख,रोमीत तोंबर्लावार,मनीष कासर्लावार,संदीप कांबळे आदींचा समावेश आहे