प्रेस क्लब मूल आणि कर्मवीर महाविद्यालय मूल च्या वतीने सर्प ज्ञान व त्याविषयी अंधश्रद्धा प्रसिद्ध सर्पमित्र तथा संजीवन पर्यावरण संस्था मूल चे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचे मार्गदर्शन.

प्रेस क्लब मूल आणि कर्मवीर महाविद्यालय मूल च्या वतीने सर्प ज्ञान व त्याविषयी अंधश्रद्धा प्रसिद्ध सर्पमित्र तथा संजीवन पर्यावरण संस्था मूल चे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचे मार्गदर्शन.


एस.के.24 तास !! राजेंद्र वाढई !! उपसंपादक


मुल : प्रेस क्लब मूल आणि कर्मवीर महाविद्यालय मूल च्या वतीने सर्प ज्ञान व त्याविषयी अंधश्रद्धा या विषयाची माहिती आणि मुल तालुक्यातील प्रसिद्ध सर्पमित्र तथा संजीवन पर्यावरण संस्था मूल चे अध्यक्ष उमेशसिंह झिरे आणि कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम चितेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडला. 

सापांविषयी माहिती, अंधश्रद्धा, विषारी की बिनविषारी, सापाने चावा घेतल्यास प्राथमिक उपचार अशा विविध विषयाची माहिती सर्पमित्र उमेश झीरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी मनात असलेले सापांविषयीचे विविध प्रश्न उपस्थित केले. त्याचे निराकरणही झिरे यांनी विद्यार्थ्यांना केले.


यावेळी मंचावर प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष शशिकांत गणवीर, उपाध्यक्ष अमित राऊत, सदस्य निलेश रॉय, कर्मवीर महाविद्यालयाचे प्राध्यापक कराळे, प्राध्यापक मांडवकर, प्राध्यापक कमलेश नागोसे, प्रेस क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !