पत्रकार नंदू गुड्डेवार यांना मातृशोक.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१३/१२/२०२४ येथील सेवानिवृत्त बालविकास प्रकल्प मुख्य सेविका तसेच काँग्रेस सेवा दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल राव गुड्डेवार यांच्या पत्नी सौ. कुसुम विठ्ठलराव गुड्डेवार (८७) रा.साई नगर यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी १२.३० वाजता निधन झाले.
त्या पत्रकार नंदकिशोर गुड्डेवार यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
शोकाकुल वातावरणात उद्या ब्रह्मपुरी येथील भीती नाल्यावरील स्मशानभूमीत त्यांचा अग्निसंस्कार होणार आहे.