दीक्षाभूमी देसाईगंज येथे महा मानवाला अभिवादन.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
वडसा : देसाईगंज संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महाप्रयाण दिनी शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ ला अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी निळा ध्वज अर्ध्या वर उतरविण्यात आला आणि माल्यार्पण करण्यात आले.
संध्याकाळी ५.वाजतापासून जगदीश कुमार ऑर्केस्ट्रा गृप चंद्रपूर तर्फे भीमगीतातून आदरांजली देण्यात आली. सहा वाजता विविध वार्डातुन कॅंडल मार्च घेऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली.
पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते सतीश डांगे सरांनी सर्वच महापुरुषांनी मानवाच्या कल्याणासाठीच कार्य केले त्यांचे कार्य पूढे सुरू ठेवले पाहिजे असे म्हटले. ग्यानचंद्र जांभूळकर सरांनी अंधश्रद्धा व बुवाबाजी पासून दूर राहा हा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात पुरूषोत्तम सहारे सरांनी प्रबोधन नुसते ऐकून सोडून न देता ते अंमलात आणता आले पाहिजे असे म्हटले. प्रमुख अतिथी म्हणून चंदुराव राऊत, वैकुंठ टेंभूर्णे व डॉ.रजनी भगत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरीता बारसागड,संचालन ममता रामटेके तर आभार जयश्री लांजेवार यांनी केले. आयोजन सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज यांनी सर्व अनुयायांच्या सहकार्यांने पुर्णत्वास नेले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती जांभूळकर सर, संजय मेश्राम, कविता मेश्राम, ममता जांभूळकर, गायत्री वाहाणे, लीना पाटील, यशोदा मेश्राम, रत्नमाला बडोले,प्रतिभा बडोले, रश्मी गेडाम यांनी सहकार्य केले.