सोनापुर येथील अनाथ तरुणास " आरंभ नाट्यकला रंगभूमी " कडून एक हात मदतीचा.
सुदर्शन गोवर्धन - प्रतिनिधी सावली
सावली : दि.21/12/2024 सोनापुर येथील बंडू गोपाळा हजारे यांना आरंभ नाट्यकला रंगभूमी सोनापुर यांच्या वतीने "एक हात मदतीचा"या उपक्रमाअंतर्गत (5000)पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दि.21/12/2024 देण्यात आली.
घरातील आई वडीलाचे छत्रछाया हरवल्याने निराधार,अनाथ झाल्याने संसार कोलमडून पडला. अशा परिस्थिती आरंभ नाट्यकला रंगभूमी प्रस्तुत सोनापुर यांच्या कडून पाच हजार रुपयांची मदत नवतरुण नाट्यकला मंडळ माध्यमातून देत सामाजिक बांधिलकीची कृतिशीलता समाजासमोर ठेवली.
सोनापुर येथील युवक बंडू गोपाळा हजारे(वय 41) यांचे आई-वडील मृत्यु पावल्याने अनाथ झाले.बंडूचे वडील 20वर्षापुर्वी व आईचे 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. अशातच मतिमंद असून घरात कमविता असे कोणीच नसल्याने सोनापुर येथील सण 2008पासून गाव व गावाबाहेर नाटकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी तत्पर असलेली आरंभ नाट्यकला रंगभूमी व नवतरुण नाट्यकला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी आरंभ नाट्यकला रंगभूमीचे निर्माता श्रीनंदकिशोर बांबोळे, वनहक्क समितीचे अध्यक्ष गजानन मट्टे,नवतरुण नाट्यकला मंडळाचे उपाध्यक्ष पवण नागापूरे, नवतरुण नाट्यकला मंडळाचे सहसचिव समर्थ बांबोळे, आरंभ नाट्यकला रंगभूमीचे कलाकार संजय नागापूरे, गुरू बांबोळे, सुदर्शन गोवर्धन, रॉकेश बोल्लीवार, रोशनकुमार गुरनुले,उमेशकुमार मेश्राम उपस्थिती होते.