नव्वोदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी चिंतन आणि चिकित्सा 'संपादित ग्रंथाला महामृत्युंजय वाड:मय पुरस्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक, २/१२/२०२४ झाडीपट्टी रंगभूमीवरील विनोदी कलावंत डॉ शेखर डोंगरे यांच्यावरील डॉ.श्याम मोहरकर,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.जनबंधू मेश्राम, डॉ.राज मुसणे यांनी संपादित केलेल्या गौरवग्रंथाला अतिशय मानाचा संपादनाला नाटयश्री साहित्य कलामंच, गडचिरोलीचा महामृत्युंजय वाड:मय पुरस्कार - २०२४ घोषित करण्यात आलेला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते १५ डिसेंबर २०२४ला करण्यात येईल असे संस्थेचे संयोजक नाटककार चुडारामजी बल्हारपुरे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. संपादनासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ मोहरकर, डॉ खानोरकर,डॉ मेश्राम, डॉ मुसणेंचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.