निर्मला फाऊंडेशन तर्फे साडया व कपडे वितरण.
एस.के.24 तास
वर्धा : निर्मला फाऊंडेशन हि संस्था मागील काही वर्षां पासून शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या श्रेत्रात अविरत कार्यरत आहे. या संस्थेच्या मार्फत आतापर्यंत आरोग्य शिबिरे,रक्त्दान, गरजु व बेघर लोकांना कपडे, ब्लन्केट वितरण,मुला - मुलींना नोटबुक वितरण ईत्यादी कामे करुन समाजातील गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आनन्याचा प्रयत्न करीत असते.
समाज कार्ये करीत ११ नोव्हेंबर ला निर्मला फाऊंडेशन ला ३ वर्षे पुर्ण झालीत. त्या निमित्ताने आज अमरावती रोड, वरील बोरगावं धांदे, तालुका - धामणगांव, येथील मातोश्री व्रुद्धाश्रमात, निर्मला फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष धिरजकुमार मारोतराव नंदेश्वर यांच्या हस्ते तेथील व्रुद्ध महिलांना साड्या आणि पुरुषांना कापड वितरण करण्यात आले.
तसेच अल्पोपहार सुद्धा वितरीत करण्यात आला. यावेळी संजय नंदेश्वर, संयम नंदेश्व्रर, विशाल कोचे, अमिन शेख, धनराज नंदेश्वर, राहुल वैद्य, संतोष नंदेश्वर, रामलाल चंदन, प्रतिक टेंभुर्णे, प्रिन्स नंदेश्वर, प्रतिक धांदे, प्रवर्तक ऊके, श्याम चंदनमाथे, आकाश वानखेडे, आणि टिम निर्मला चे ईतर सदस्य ऊपस्थित होते.