गर्भवती महिले वर वाघाने हल्ला करून केले ठार.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चातगाव बीट मधील जुमगाव मोड रा.कुरखेडा लगतच्या जंगलाला लागून असलेल्या शेतात काम करीत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपार च्या सुमारास घडली.
मृतक महिलेचे नाव शारदा महेश मानकर वय,25 वर्ष असून सुरेश मानकर यांची ती सून होती.मृतक महिलेला एक 3 वर्षाचा मुलगा आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला हि शेतातील खऱ्यावर कामाकरिता गेली असता जंगला लगत शेत असल्याने जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढवला व तिला ठार केले. बाजूचा शेतात सुद्धा अनेक महिला काम करीत होत्या पण ही एकटी असल्याची संधी साधून वाघाने गर्भवती महिलेवर हल्ला चढवून तिला ठार केले.
सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आलेली असून वन विभागाची टीम मौजा चातगाव बीट मध्ये दाखल होऊन पंचनामा व पुढील कारवाई करत आहे.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे सदर प्रकरणाची दखल घेत वन विभागाने मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेने केलेली आहे या परिसरात वावरत असणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा याप्रसंगी नागरिकांनी केलेली आहे.
सदर मृतक महिलेचे शव उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.